सात हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्यांविरोधात गुन्हा दाखल
हिंगोली : पोलीस न्यूज नेटवर्क
20 May 2020
सात हजारांची लाच मागणार्या तलाठ्यावर अखेर एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली तालुक्यातील घोटा येथील सज्जाचा तलाठी अनिलकुमार गवई हे एसीबीच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी तक्रारदाराकडे ७ हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याची तलाठी गवई यांनी सहमती दर्शवली. परंतु कारवाई दरम्यान तलाठ्यास संशय आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही.
त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती की घोटा येथील सज्जाचे तलाठी अनिलकुमार गवई हे केसापूर शेत शिवारातील गट क्रमांक २९१, २९२, ३०२, ३०७ मधील शेताचा त्यांचे आई व बहिणीचे हक्क सोड पत्र प्रमाणे जमिनीचा फेर तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने घेऊन तसा सातबारा बनवून देण्यासाठी ७ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडी अंती ठरल्यापैकी ५ हजार रूपये देण्याचे ठरले.
Story Contribution From:
This content is from the contributor and not edited by India Crime. The content is published as received.