Scams

Bank Scam: ४३० कोटीच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लुटीवर ईडी चुप का – किशोर तिवारी

इंडिया क्राईम

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२१

संपुर्ण महाराष्ट्रात किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात ईडी मनी लाँडरिंगच्या खोट्या केसेस करण्यात गुंतली असतांना त्यांना यवतमाळ येथील हजारो शेतकरी विधवा, दलित, मुस्लिम, आदीवासी, मध्यमवर्गीय लोकांच्या ठेवी व जमा पैशाची बँकेचे अधिकारी, संचालक, ऑडिटर, रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३७० कोटीची केलेली लुट जगासमोर आल्यानंतरही चुप का? असा सवाल शिवसेना नेते किशोर तिवारी केला असुन महाराष्ट्र पोलीस कडुन एसआईटी निर्माण करून बँकेचे अधिकारी, संचालक, ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व लुटीची रक्कम बाहेर काढणार व एकाही ठेवीदार वा ग्राहक यांची घामाची कमाई बुडणार नाही। यासाठी शिवसेना सर्व चोरांना आंदोलन करून गजाआड करेल, अशी हमी आज बाबाजी दाते महिला सहकारी बँक ग्रस्तांच्या बैठकीत दिली।

एकवर्षांपूर्वी ज्या बँकेचा एनपीए फक्त ४ टक्के होता तो एकदम ऑडिटर नवा आल्यानंतर ३१ मार्च २०२१ च्या अंकेक्षणामध्ये बँकेचा नेट एनपीए ५१.११ टक्के तर ढोबळमानाने ६४.१३ टक्केपर्यंत पोहचल्याचे दिसून आले। बँकेला ‘ड’ दर्जा देण्यात आला। हा सर्व प्रकार बँकेचे अधिकारी, संचालक, ऑडिटर, रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संघटीतपणे केलेल्या लुटीने साध्य झाले आहे याला बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न जबाबदार असुन व हा सर्व प्रकार मागील ५ वर्षापासून जगासमोर आल्यानंतरही सारे गप्प का होते हा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे।

८ नोव्हेंबर रोजी रिझर्व बँकेने परिपत्रक काढून बँकेवर निर्बंध लादले आहेत खातेदारांनी ५ हजार रूपये काढण्याचे निर्देश आरबीआयने दिले मात्र कालावधी स्पष्ट नमुद केलेला नाही ही सर्व परिस्थिती संचालक मंडळ तसेच बॅक व्यवस्थापनाने स्वत:च्या आर्थीक हितसंबंधातून व हितसंबंधांना कमी किमतीच्या मालमत्तांवर जास्त कर्ज दिल्याने थकित कर्ज व वसुलीचा समतोल एनपीए ७० टक्के नेण्यासाठी कारणीभुत झाली आहे।

ही बँक सहकार भारती या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तसेच परमपूज्य बाबाजी दाते यांनी स्थापन केली असल्यामुळे संघ परिवाराच्या हजारो गरीबांचे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहे कारण अनेक कर्जदाराच्या नावावर बँक व्यवस्थापनाकडून परस्पर रक्कम काढण्यात आल्यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्याचे दिसून आले आहे।

यामध्ये प्रकाश पिसाळ व त्यांच्या पत्नीच्या कागदपत्रावर परस्पर चार चार कोटींचे कर्ज उचलण्यात आले व परस्पर भरणा करण्यात आल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली मात्र सहकार विभागाने हे प्रकरण पैसे खाऊन दाबले त्यानंतर पंकज जयस्वाल यांच्या मालमत्तेचा लिलाव करताना निकषाचे पालन करण्यात आले नसल्याची तक्रार देण्यात आली त्याच बरोबर रिया सोधी यांच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या सीसीवर परस्पर बँकेकडून ६० लाख रूपयांपर्यंत रक्कम उचल करून खाते एनपीए करण्यात आले। त्यानंतर त्यांना टर्म लोन देवून तो पैसा एनपीए खात्यात वळविण्यात आला। त्यांच्या चेकही गैरवापर बँक व्यवस्थापन केला असून न्यायप्रविष्ठ प्रकरणी कागदपत्र नष्ट करण्यात आल्याची तक्रार रिया सोधी यांनी जिल्हा उपनिबंधक व डिआरटीकडे केली आहे।

सुरेश शिंदे पाटील हे संस्थेचे फाउंडर मेंबर असून त्यांनी कर्ज घेतलेल्या ५० लाख रूपयांचा भरण केल्यानंतरही त्यांच्यावर व्याजासह ७० लाख रूपयांचे कर्ज असून त्याचा भरणा करण्याच्या सूचना बँकेने दिलेल्या यासंदर्भातील तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केलेली आहे। बँकेच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या पतीराजाचा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप असून कुठलीही प्रॉपर्टी मॉर्गेज न ठेवता कर्ज उचलल्याची खात्रीलायक माहिती आहे। 

अशा अनेक तक्रारी आरबीआई व जिल्हा उपनिबंधकांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही,आमच्या कडे भरपुर प्रकरणे प्रलंबीत असून सवड मिळत नसल्याचे कारण दिले जाते।

वास्तविक जिल्हा उपनिबंधकांचा कारभार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे,त्यांची भुमीका बँकेच्या बाजूला असून पिडीतांना अन्याय केला जात आहे।

जिल्ह्यातील इतर शाखांमधूनही तक्रारींचा ओघ वाढला आहे। हा सर्व प्रकार आंधळा दळत आहे व कुत्रे खात आहेत असा असुन यावर एकही भाजपा आमदार मात्र बोलत नसुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे जीवनभर कमाई करून जमविलेले घामाचे पैसे चोरांनी लुटल्यानंतर त्यांचा नाकर्तेपणा पाहण्यासारखा आहे। 

सध्या महाराष्ट्रात अनेक नागरी सहकारी बँका व पत संस्था बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न चालवीत असल्यामुळे त्यांचा एनपीए सुद्धा दाते महिला सहकारी बँके जास्त असुन फक्त ऑडीटर आरबीआय व सहकार खात्यातील चोर अधिकारी यांच्यामुळे दाबून ठेवण्यात येत आहे मात्र सर्व चड्डीवाले वा भाईजी छाप लुटेरे व बेनामी संपत्ती व्यवस्थापन करणारे मात्र दररोज नीतिमत्ता चारित्र्य राष्ट्रनिर्माण यावर सहकाराच्या माध्यमातुन क्रांती करण्याचे थोतांड करणाऱ्यांचा पर्दाफाश लवकरच करू असा विश्वास किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला। 

समाचार का मूल स्रोत

++++

Bank Scam, Babaji Date Mahila Sahkari Bank, बाबाजी दाते महिला सहकारी बँक, ED, ईडी, Maharashtra, महाराष्ट्र, Money Laundring, मनी लाँडरिंग, Yavatmal, यवतमाळ, Farmer Widows, शेतकरी विधवा, Dalit, दलित, Muslim, मुस्लिम, Tribal, आदीवासी, Middile Class, मध्यमवर्गीय लोकांच्या, Deposits, ठेवी, जमा पैशा, लुट, Loot,

++++

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Web Design BangladeshBangladesh Online Market