CrimePolice News Marathi

अबू अझमीच्या विरोधात एफआयआर

मुंबई : पोलीस न्यूज नेटवर्क

20 May 2020

महिलेशी हुज्जत घालणे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना चांगलचं महागात पडलं आहे. आमदार अबू आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, आपत्ती कायदा आणि गर्दी जमवणे असे अनेक आरोप अबू आझमी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 27 मे रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर रेल्वेने गाड्यांविषयी माहिती न दिल्याने हजारो लोक मुंबई रेल्वे स्टेशनबाहेर जमले होते.

जवळपास 5 ते 6 तास लोक आत जाण्याच्या प्रतिक्षेत थांबून होते. तर रेल्वे स्थानकाबाहेर वरिष्ठ पोलीस अधिकारी शालिनी शर्मा तैनात होत्या. त्यांनी रेल्वेने नेमकी कोणती गाडी कधी सुटेल याची माहिती दिली नाही. तोपर्यंत कोणाला आत सोडता येणार नाही असे सांगितले.

त्यातच रेल्वेने गाड्या रद्द केल्याने पोलिसांनी सर्वांना घरी जाण्यास सांगितले.

याच वेळी त्या ठिकाणी आमदार अबू आझमी आले आणि त्यांनी शालिनी शर्मा यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जमावासमोर भाषण देखील केले.

यामुळे जमावाने पोलिसांविरोधात घोषणा बाजी देखील केली अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अबू आझमी यांनी ज्या महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली.

त्या पोलीस अधिकारी शालिनी शर्मा यांची या प्रकरणानंतर बदली करण्यात आली नसून ही एक सामान्य बदली असल्याचे पोलीस उपायुक्त आभिनाश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

Story Contribution From:

This content is from the contributor and not edited by India Crime. The content is published as received.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Web Design BangladeshBangladesh Online Market